
पर्यावरणसंपन्न गावात औद्योगिक क्षेत्र हब कशाला?मिर्यावासिय एकवटले, औद्योगिक क्षेत्रास ठाम विरोध
आमच्या निसर्गरम्य गावची धुळधाण आम्ही होवू देणार नाही, असे म्हणत शुक्रवारी जाकिमिर्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत औद्योगिक क्षेत्रास विरोधाचा ठराव प्रशासनाकडून आलेल्या नोटीसांसंदर्भात ग्रामस्थ एकाचवेळी हरकती दाखल करतील. आमच्या गावात औद्योगिक क्षेत्र नकोच, असाही निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.जाकिमिर्या ग्रामपंचायतीमध्ये १५ ऑगस्ट रोजी तहकूब झालेल्या ग्रामसभेचे शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी आयोजन केले होते. रत्नागिरी शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि तीनही बाजूने समुद्राने वेढलेल्या मिर्या गावतील ७५ टक्क्याहून अधिक जमीन आता औद्योगिक महामंडळ म्हणून विकसित करावी, अशी अधिसूचना काढली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांना आलेल्या नोटीसा घेवून ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामसभेला हजर होते. सरपंच आकांक्षा कीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक माने उपस्थित होते.अर्धी जमीन औद्योगिक क्षेत्र व उरलेली जमीन समुद्री महामार्गाच्या नावाखाली हस्तांतरित केली जात आहे. पर्यावरणसंपन्न गावात पर्यावरणावर आधारित उद्योगास चालना देण्याऐवजी औद्योगिक ेत्रास आमचा विरोध आहे. मच्छिमार म्हणून आयुष्य काढलेल्यांनी स्थलांतरानंतर नक्की कुठे आणि कसं जगायचं, असा प्रश्न ग्रामस्थांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. कोकण विकासाच्या नावाखाली कोकणातील निसर्गसुंदर गाव उध्वस्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या यादीत आता रत्नागिरी शहरानजिकच्या मौजे मिर्या (सडामिर्या) आणि जाकिमिर्या या दोन्ही गावांचा समावेश आहे. या गावांमधील ७५ टक्क्यापेक्षा जास्त जमिनीत औद्योगिक प्रकल्प होणार आहे. www.konkantoday.com