
दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखे बाबत अफवावर विश्वास ठेऊ नये,शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
देशात कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल, यावर राज्य सरकारचा भर आहे. दरम्यान, समाज माध्यमातून शिक्षण आणि निकालाबाबत अफवा पसरविण्यात येत असल्याचे पुढे येत आहे. दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा पसरली आणि गोंधळात भर पडली. यााबबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. ही केवळ अफवा आहे. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com