कोकणासाठी आपण विशेष आर्थिक मदतीची मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार- रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा केला. कोकणाला निसर्ग चक्रीवादळाची प्रचंड मोेठ्या प्रमाणात झळ बसली असल्याने कोकणासाठी आपण विशेष आर्थिक मदतीची मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देऊन व तसे पत्र देऊन आपण कोकणवासीयांना जास्तीत-जास्त आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्याकरिता आग्रह धरणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
www.konkantoday.com