
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज व फोमेंतो या पंचतारांकित हॉटेल उभारणीचा मार्ग मोकळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज व फोमेंतो या पंचतारांकित हॉटेल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिरोडा- वेळागर येथे पंचतारांकित हॉटेलसाठी करार केला. या करारामध्ये तीन वर्षाच्या आत हॉटेल सुरू झालेच पाहिजे अशी अट सरकारने टाकली आहे. सर्व्हे नं. ३९मध्ये राहणार्या ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच या पंचतारांकित हॉटेलची उभारणी केली जाईल, त्या ग्रामस्थांना वार्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही खा. विनायक राऊत यांनी दिली. सागरी पर्यटनासोबत सिंधुदुर्गात डोंगरी पर्यटनही होण्यासाठी प्रयत्न सुरू असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बारमाही पयर्टन जिल्हा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com