मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार
पावसाळ्यात मुंबईत कोरोनाचा हाहाकार उडेल, अशी शक्यता मुंबई आयआयटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबई कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे दिली.
www.konkantoday.com