
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन म्हणून समाजातील गरजू, गरीब , गुणवंत विद्यार्थ्यांना मदत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन म्हणून समाजातील गरजू, गरीब , गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने “वही पेन शैक्षणिक साहित्य” अभियान ( वर्ष दुसरे)राबविण्यात आले.या अभियानाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
” वही पेन शैक्षणिक साहित्य “अभियानाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून संस्थेचे अध्यक्ष चंद्रमणी सावंत आणि इतर पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त करतांना नवीन शैक्षणिक वर्षात जून महिन्यात जिल्हाभरातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणार आहोत अशी माहित दिली .




