
रत्नागिरी जैन समाजाचा चक्रीवादळग्रस्त लोकांना मदतीचा हात
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रत्नागिरी जैन समाजाच्यावतीने कायमच सामाजिक उपक्रम केले जातात.कोरोना लॉकडाउन कालावधीत गरजू लोकांना मदत असो किंवा मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून गावागावात चेकअप असो रत्नागिरी जैन समाज कायमचा आघाडीवर असतो.आता रत्नागिरी जैन समाजाच्यावतीने दापोली तालुक्यातील वादळग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.काल रत्नागिरीतून जैन समाज बांधव दापोली तालूक्यातील आंजर्ले गावात तातडीची मदत म्हणून सुमारे 950 kg भाजीपाला, 250 ली. दूध,बिस्कीटे, 500 बॅटरी, बिस्लरी पाणी बाॅक्स, ट्रक भर घरावरील कौल, मेणबत्या, माचिस बाॅक्सेस इत्यादी आवश्यक आणि गरजेच्या वस्तू घेऊन गेले.या वेळी बोलताना जैन बांधवांनी सांगितले की आम्ही काही भागांत प्रत्यक्ष जाऊन आलो. आंजर्ले,केळशी, मुर्डी अशा आजूबाजूच्या गावात घरांचे, बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.गेले आठ दिवस त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे आणि पुढील काही दिवस वीज येण्याची चिन्हे नाहीत.या वाटपा प्रसंगी जैन समाज बांधव,गावातील बुजूर्ग ग्रामस्थ, सरपंच आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com