मुंबईत जवळपास ५० लाख लोकं कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात मुंबई महानगरपालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ करोना रुग्ण आढळले आहेत. तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील करण्यात आलं आहे. महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख लोकं राहतात. तर, पालिकेनं सील केलेल्या इमारतींमध्ये ८ लाखांहून अधिक लोक राहतात. या आकडेवारीनुसार, १.२५ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत जवळपास ५० लाख लोकं कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात राहत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button