
भूमिगत वीजवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे, जमिनीतून ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लाेट
चक्रीवादळ निवारा व्यवस्थापनांतर्गत आपत्ती येथील किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीज वितरणची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या वीजवाहिन्यांच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांसाठी धाेकादायक ठरत आहे. शहरानजिकच्या शिरगाव घवाळीवाडी येथे रस्त्यालगत साेमवारी सकाळी या वीजवाहिनीतून माेठ्याप्रमाणात ज्वाळा येत हाेत्या. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. शहरानजिकच्या मिऱ्या येथे काही दिवसांपूर्वी भूमिगत वीज वाहिन्यांच्या अर्धवट कामामुळे फिरत्या गुरांना वीजवाहिनीचा शाॅक लागून गतप्राण झाल्याची घटना घडली हाेती.
त्यावरूनच या कामातील कारभार चव्हाट्यावर आलेला हाेता. साेमवारी अशाचप्रकारे शहरानजिकच्या शिरगाव घवाळीवाडी परिसरात रस्त्याकडेला एका डीपीजवळ स्पार्किंगमुळे स्ाेट झाला. त्यामुळे जमिनीतून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लाेट बाहेर पडू लागताच नागरिकांची घाबरगुंडी उडाली. या वाहिन्यांतील अर्धवट कामांच्या घटना लाेकांच्या जीवावर बेतू शकतात. यावर वेळीच उपाययाेजना हाेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.www.konkantoday.com