
कोकणात मान्सून दाखल, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरी बरसल्या
निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर कोकणात मान्सून लांबण्याची शक्यता होती. मात्र आता रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या आगमनाकडे शेतकर्यांचे डोळे लागले होते. एक दिवस उशीरा हा मान्सून जिल्ह्यात दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्या सरी रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यात बरसल्या आहेत. त्यामुळे आता नियमित मान्सूला सुरूवात झाली आहे. कोकणाबरोबरच मराठवाड्यातही मान्सूनचे आगमन झाले आहे.
www.konkantoday.com