सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सारखी कोरोनाची लॅब सुरू करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली असली तरी त्याला काही दिवसांचा कालावधी जाणार आहे. सुरूवातीला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये लॅब सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी त्याठिकाणी लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मधल्या काळात कोरोनाचे रूग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढल्यामुळे लॅबवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये ट्रूनेट यंत्रणा कोरोना तपासणीसाठी सुरू करण्याचे राणे कुटुंबियांनी जाहीर केले. त्यासाठीचा खर्च राणे कुटुंबिय करणार असल्याचे सांगण्यात आले. ही लॅब आठ दिवसात उभी केली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. दरम्याने राणे यांची ही लॅब सुरू होण्याआधीच पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय रूग्णालयात शासनाच्यावतीने ट्रूनेट टेस्टींग लॅब सुरूही केली. त्यातून तपासण्याही सुरू केल्या. त्यामुळे आता कोरोना टेस्टिंग लॅबवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शह-प्रतिशहाचे राजकारण सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणामुळे का होईना सिंधुदुर्गात ही लॅब सुरू झाल्याने त्याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना होणार आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या सिंधुदुर्गात आता कोरोना टेस्ट लॅबवरून शह-प्रतिशहाचे राजकारण सुरू, राणेंची ट्रूनेट यंत्रणा सुरू...