
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते पुलाचे कामाबाबत मनसेची बांधकाम विभागावर धडक
चिपळूण येथील मुंबई-गोवा महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथील कळंबस्ते येथील पुलाचे काम योग्य रितीने चालू नव्हते. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी बांधकाम विभाग तसेच हे काम करणार्या ठेकेदार चेतक कंपनीवर धडक मारून जाब विचारला. यावेळी चिपळूण शहराध्यक्ष गणेश भोंदे, उपशहरअध्यक्ष परेश घोरपडे, तालुका उपाध्यक्ष सुनिल हळदणकर, विद्यार्थी सेनेचे निलेश मोरे, सुबोध सावंत आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com