
खा. शरद पवार आज दापोली दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज दापोली दौऱ्यावर येत असून नुकसान ग्रस्थ भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर विविध खात्यांचा आढावा घेणार आहेत.
दिनांक १० जून रोजी सकाळी ९ वाजता बाणकोट जेटी येथे आगमन होणार असून बाणकोट येथील चक्री वादलामध्ये बाधित झालेल्या घरांची पाहणी करणार आहेत. सकाळी १0 वाजता मंडगड , दुपारी ११.४५ च्या सुमारास वेळास १२.१५ वाजता केळशी १२.३० उतम्बर आडे, १ वाजता आंजर्ला मूर्डि, १.१५ वाजता पाज पंढरी, १.३० वाजता हर्णै, १.४५ वाजता आसूद, २ वाजता मुरुड, २.३० वाजता दापोली येथे आगमन (राखीव) होणार असून ३.३० वाजता हॉटेल साधना, बूरोंडी रोड येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com