रत्नागिरी जिल्हा परिषदेला निसर्ग वादळाचा फटका, अंदाजे १५ कोटींचे नुकसान
नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळाने दापोली तालुक्यातील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असतानाच आता या निसर्ग वादळाचा फटका जिल्हा परिषदेलाही बसला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ९०५ मालमत्तांना त्याचा फटका बसला आहे. या निसर्ग वादळात ११० ग्रामपंचायतींची कार्यालये, १७५ स्मशानभूमी, बांधकाम विभागाच्या ४ इमारतींचे पत्रे, आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची २१ केंद्रे आणि ३२ उपकेंद्रे यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या २१९ शाळांचे तसेच अंगणवाडीच्या १२९ इमारतींचे नुकसान झाले आहे. याशिवाय माध्यमिक ३१ शाळाही या वादळामुळे बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या एका पशुदवाखान्याचे व वसतिगृहाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान अंदाजे १५ कोटींच्या आसपास झाले असल्याचा हा प्राथमिक अंदाज आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी आपण शासनाकडे निधीची मागणी करत असल्याचे जि.प.चे अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com