केळशी वासियांना मनसेच्या वैभव खेडेकर यांचा एक मदतीचा हात
रत्नागिरी-चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठा प्रमाणात नुकसान झाले होते. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या जागांवर जाऊन मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटनीस खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱयांनी पाहणी करून मदत केली.बुधवार दिनांक ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी या गावामध्ये भूतो न भविष्यति अशी हानी झालेली आहे. दोन्ही गावांमधील नारळ, पोफळी आणि आंब्याच्या बागांची अपरिमित हानी झाली आहे. केळशी मध्ये तर जवळपास प्रत्येक घरात काही ना काही पडझड झालेली आहे. गेले दोन दिवस केळशी गावाचा बाह्य जगाशी संपर्क तुटला होता.आता वादळानंतर केळशी पर्यंतचा रस्ता काही प्रमाणात मोकळा करण्यात यश आले.विज खांब तुटल्याने खंडीत झालेला विज पुरवठा अजूनही खंडीत आहे या ठिकाणावरील एकंदरीत सर्व परिस्थितीची मनसे सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन. नागरिकांशी संवाद साधुन सर्व परिस्थितीची माहिती घेऊन नागरिकांना धीर दिला.तसेच त्यांनी चक्रिवादळग्रस्त लोकांना अन्नधान्य कीट, मेणकापड,स्प्रे मशिन,सोडीयमहायपो, अर्सिनिक अल्बम ३० औषध,सॅनिटायझर घेऊन प्रत्यक्ष मदत केली.
www.konkantoday.com