आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर
कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादामुळे कोकणामध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानाच्या पाहणीसाठी व नुकसानग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे १२ जुन रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.१२ जुन रोजी सकाळी ९ वाजता माहाडहुन वेळासकडे मोटारीने प्रयाण.१।३० वाजता वेळास येथे आगमन व पाहणी.११ वाजता वेळासहून केळशी कडे प्रयाण.११.४५ला केळशी येथे आगमन व पाहणी.१.४५ला मोटारीने आंजर्ले येथे प्रयाण.२ वाजता आंजर्ले येथे आगमन व पाहणी.३.४५ वाजता आंजर्ले येथून पाच पांढरे येथे प्रयाण.४ वाजता पाच पांढरी येथे आगमन व पाहणी.४.३० वाजता पाच पांढरे येथून दापोलीकडे प्रयाण.५ वाजता दापोली येथे आगमन व पाहणी व ६.३० वाजता दापोलीतून मुंबईकडे मोटारीने प्रयाण.
www.konkantoday.com