शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तात्पुरते कारागृह उभारण्याचा निर्णय
रत्नागिरी विशेष कारागृहात कैदी ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तात्पुरते कारागृह
उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २० पुरुष आणि २०महिला असे
४० कैद्यांच्या क्षमतेचे कारागृह गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उभारण्यात येणार आहे.या ठिकाणी योग्य त्या सुविधा आणि आवश्यक खबरदारी घेऊन तात्पुरते कारागृह उभारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
www.konkantoday.com