
उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून विनायक राऊत यांना एबी फॉर्म
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. पण याच मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवायला प्रारंभ केलाय. मंगळवारी गुढीपाडव्ययाच्या मुहूर्तावर विनायक राऊत यांना उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म बहाल केला.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा अधिक चुरस व रंगत येणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. राजकीय आखाड्यात उतरलेले महायुती आणि महाविकास आघाडी जणू हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीत गुंतले आहेत. येथील निवडणुकीच्या आखाड्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांचे नाव जाहीर होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही वेट ऍण्ड वॉच भूमिकेवर आहेत. www.konkantoday.com