विरोधी नेते प्रविण दरेकर आज रत्नागिरी दौ-यावर मंडणगड, दापोली मधील नुकसानग्रस्त भागांची करणार पाहणी
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आज सोमवार ८ जून २०२० रोजी रत्नागिरीच्या दौ-यावर येत आहेत. निर्सग चक्रिवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दोपोली तालुक्यांचे या चक्रिवादळात प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी दरेकर उद्या या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या सोबात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी विरोधी पक्ष नेते दरेकर यांची दापोली तहसीलदार कार्यालय येथे शासकीय अधिका-यांसमवेत बैठक होणार आहे. याप्रसंगी महसूल, पोलिस, कृषी, वैद्यकीय व विद्युत वितरणचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर दापोली येथील चक्रिवादळग्रस्त गावांची पाहणी करण्यात येईल.
विरोधी पक्ष नेते दरेकर दुपारी दोन वाजता मंडणगड येथील चक्रिवादळग्रस्त गावांचा पाहणी करणार असून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रिवादळाचा फटका बसल्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सर्वप्रथम तातडीने रायगड जिल्ह्याला भेट दिली. अलिबागसह तेथील अन्य भागांची पाहणी केली. तेथील नुकसाग्रस्त वाडी व शेती बागांना भेट देऊन कोकणासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली. त्यानंतर दुस-या दिवशी मुख्यमंत्र्यांनी रायगडला भेट देऊन फक्त १०० कोटीची मदत जाहिर केली होती.
www.konkantoday.com