
लॉकडाउनमध्ये शिथीलता देताच मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी
राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यास सुरुवात करताच मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. लॉकडानमुळे निर्मनुष्य झालेली ठिकाणं, रस्त्यांवर आज पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरु नसल्याने लोक खासगी वाहनं, दुचाकीने प्रवास करत असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आजपासून काही प्रमाणात नियम शिथिल केले आहेत. ही शिथिलता मिळताच मुंबईत रस्त्यांवर गर्दी झाल्याचं पहायला मिळालं.
www.konkantoday.com