
मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला जलतरण स्पर्धा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची महिला जलतरण स्पर्धेतील पहिल्या उपविजेतेपदाला गवसणी
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आणि काशीबाई मोतीलाल पटेल मातोश्री कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय ठाकुर्ली (ईस्ट मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १७ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) पुरुष व महिला संघाने २ सुवर्ण, ५ रौप्य, ३ कांस्य पदक पटकावत महाविद्यालयाच्या इतिहासातील महिला जलतरण स्पर्धेतील पहिल्या उपविजेते पदाला गवसणी घातली.
या स्पर्धेचे आयोजन ऑलम्पिक स्पोर्ट्स सेंटर लेकशोर ग्रीन्स पलावा सिटी डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. या स्पर्धेतील संघामध्ये महाविद्यालयाचे पुढील विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते. जलतरण स्पर्धा पुरुष गटात करण मिलके याने १०० मी. बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले. महिला संघात तनया मिलके हिने अनुक्रमे १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक, तर २०० मी. मेडली प्रकारात रौप्य पदक, ५० मी. फ्री स्टाईल प्रकारात रौप्य पदक, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्य पदक, १०० मी. फ्री स्टाईल प्रकारात रौप्य पदक, ५० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक, २०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात कांस्य पदक, ४०० मी. फ्री स्टाईल प्रकारात कांस्य पदक, तर २०० मी. बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.
तसेच महिला जलतरण ४×१०० मी. रिले संघाने फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. या संघात तनाया मिलके, संस्कृती जाधव, श्रावणी सावंत आणि नफिजा मंगा यांचा समावेश होता.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) महिला स्विमिंग संघाने महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला जलतरण २०२५-२६ स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष महेश मिलके यांनी
मार्गदर्शन केले. तसेच सौ. गौरी मिलके, सहाय्यक क्रीडाशिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांचे सहकार्य लाभले.
मुंबई आंतर विद्यापीठ जलतरण पुरुष आणि महिला स्पर्धेत पदक आणि सर्वसाधारण जलतरण २०२५-२६ स्पर्धेचे पहिले उपविजेतेपद प्राप्त विद्यार्थी खेळाडू यांना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




