रत्नागिरी ,सिधुंदुर्गला तुटपुंजी मदत देऊन सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली -विरोधी पक्ष नेते आ.प्रवीण दरेकर

शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले म्हणून सत्ता उपभोगत आहेत. मात्र सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने कोकणला त्यातूनही रत्नागिरी ,सिधुंदुर्गला तुटपुंजी मदत दिली असून सरकारने ही मदत देऊन जनतेच्या तोंडाला पाने पुसली असून विरोधी पक्ष म्हणून सरकारवर दबाव आणून भरघोस मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आ.प्रवीण दरेकर यांनी दापोलीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्या समवेत आ.प्रसाद लाड , आ.भाई गिरकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी ,जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू,यांच्या सह अन्य मान्यवर दापोली व मंडणगड तालुक्याच्या दौर्यावर आज दिं.८ जून रोजी आले होते.
दापोलीच्या तहसील कार्यालयात विविध खात्यांचा आढावा घेतल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर म्हणाले की दापोली तालुक्यातील मुरुड,कर्डे,हर्णे,पाजपंढरी,अंजर्ले , केळशी, मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेळास, व अन्य भागांमध्ये घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच आंबा, नारळ, सुपारी, काजू, फणस, यांच्या फळबागा व त्यावर आधारित असलेली मसाले पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
राज्यसरकार राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार या भागातील जनतेला मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र झालेले नुकसान पहाता या धोरणाच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने मदत जाहीर करण्याची गरज आहे.
प्रत्येक घराला किमान ३ लाख तसेच प्रत्येक झाडाला ज्या प्रमाणे रस्ते,व अन्य प्रकल्पामध्ये त्यांचे मूल्यांकन करून दिली जाते त्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. प्राथमिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला सरकारने तात्काळ १० हजार रुपये द्यावेत अशी आपली मागणी आहे.
दापोली तालुक्याचा विचार करता महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ४० हजार घरे बाधित झली असून आतापर्यंत केवळ १० टक्के घरांचे पंचनामे झाले आहेत.
तोंडावर आलेला पावसाळा पाहता या भागातील व्यक्तींना निवासाची सोय होणे गरजेचे आहे.त्या मुळे सरकारने बाहेरून मदत मागण्यापेक्षा गावागावात असलेले पोलीस पाटील मान्यवर व्यक्ती यांचे साह्य घेऊन पंचनामे वेगाने करावे
देवेंद्र फडणवीस यांचे
सरकार असताना आलेल्या महापुरात अशाच पद्धतीने पंचनामे करण्यात आले होते.
कोकणी माणूस हा झालेल्या नुकसानीची आकडेवारी ही खरीच सांगेल कारण कोकणी माणूस हा कोनापुढे हात पसरत नाही असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
केंद्र सरकर कोणती भूमिका घेणार या विषयावर बोलताना दरेकर म्हणाले की प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवून राज्यसरकार आपली जबाबदारी ज्या पद्धतीने ढकलत आहे.तसे यावेळी आम्ही चालु देणार नाही.
केंन्द्रिय कृषी मंत्री तोमर यांनी कोकणातील परीस्थितीचा नुकताच आढावा तालुका पातळीपर्यंतच्या घेतला असून केंद्रसरकारही निश्चितच आपले धोरण या आपत्तीबाबत जाहीर करेल व त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असे त्यांनी या वेळी सांगितले.
यावेळी आमदार फंडातून दापोली तालुक्याला जी मदत लागेल ती देण्याचे आ.प्रसाद लाड, आ.भाई गिरकर आ.प्रवीण दरेकर आ.निरंजन डावखरे यांनी जाहीर केले.
या पत्रकार परिषदेनंतर आमदारांनी विविध भागात जाऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली त्यांचे समवेत भाजपचे जिल्हाद्यक्ष केदार साठे,जिल्ह चिटणीस श्रीराम (भाऊ ) इदाते तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इकबाल परकार जिल्हा महिलाध्यक्ष सौ स्मिता जावकर यांचे सह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button