गावातील परिस्थिती वेळीच पूर्वस्थितीत कशी येईल या कडे जास्तीत लक्ष द्या -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.प्रसाद लाड, भाई गिरकर, माधव भांडारी ,विनय नातू ह्यांनी आज दापोली दौरा केला सकाळी१०वाजता दापोली तहसील कार्यालयात तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी यांच्याजवळ चक्रीवादळात झालेल्या नुकसानी बाबत माहिती घेऊन तत्परतेने त्या त्या गावातील परिस्थिती वेळीच पूर्वस्थितीत कशी येईल या कडे जास्तीत लक्ष द्या अशी सुचना विरोधी पक्षनेते .प्रवीण दरेकर यांनी केली या करिता लागणारी यंत्र सामुग्री घ्या तेथील नागरिकांना विश्वासात घ्या व त्यांच्या झालेल्या नुकसानीची परिपूर्ण माहिती घेऊन पंचनामे करण्यासाठी कर्मचारी वाढवा तसेच एकूण प्रक्रियेसाठी मनुष्य बळ वाढवा असेही त्यानी सांगितले. या सर्व गोष्टीसाठी लागणारी मदत व अडचण आली तर लगेच आमच्याशी संपर्क साधा आमच्या आमदार फंडातून मदत करू असे ही दरेकर यांनी सांगितले बाग मोकळी कशी करावी ,झालेल्या घाणीचे कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी विद्यापीठाचे मार्ग दर्शन घेणे, ज्यांची घरे उधवस्त झाली आहेत. त्यांना त्वरित मदत करून उभी करावी यात कुठेही पक्षपातीपणा असता कामा नये या प्रसंगात सगळे एक झाले आहेत नुकसानीची त्वरित पंचनामे व्हावे , त्यांना असणाऱ्या अडचणी वेळीच दूर करणे,लागणारी मदत तात्काळ करणे, जिल्हा अधिकाऱ्यांकडून ज्या अडचणी असतील त्या आम्हाला कळवा. आम्ही लगेच सोडवू असे त्यानी सांगितले
www.konkantoday.com