
रत्नागिरीसाठी ७५ कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी तात्काळ मदत जाहीर – ना.उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण कोंकण परिसराची वाताहत झाली,याच पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली होती ,त्याच प्रमाणे मा.ना.श्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसराचा दौरा करून,नुकसानीचा आढावा घेतला.
आज मा.मुख्यमंत्री यांनी तातडीने *व्हिडीओ काँफरन्स बोलावून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७५ कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी तात्काळ मदत जाहीर केली आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मा.मुख्यमंत्री यांनी खासदार श्री विनायक राऊत,मा.ना.श्री एकनाथ शिंदे ,मा.ना.श्री उदय सामंत,मा.ना.श्री अनिल परब, मा.ना.श्री दादा भुसे आणि सर्व जिल्हाधिकारी आणि आमदार योगेश कदम,आमदार वैभव नाईक ,सर्व लोकप्रतिनिधी यांचे समवेत संवाद साधला.
www.konkantoday.com