
आश्वासने देऊनही भाटे खाडीच्या मुखाशी असलेल्या गाळाचा प्रश्न जैसे थे
भाट्ये खाडी आणि मांडवी बंदराच्या दरम्यान प्रचंड गाळ साचला आहे.यातील गाळ काढला जात नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मच्छीमारांना नौका नेण्या-आणण्यास भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी गाळ काढू, अशी आश्वासने दिली. परंतु गाळ काढला गेला नाही. राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने या गाळ उपशाचा प्रश्न उचलून धरला आहे.
भाट्ये खाडीतील राजिवडा बंदर हे पूर्वी महत्वाचे बंदर होते. या खाडीतून राजीवडा बंदरामार्गे अगदी हातिस, इब्राहीमपट्टमपर्यंत मोठे मचवे व गलबते, होड्या जात असत. परंतु भाट्ये खाडीच्या मुखासह हातिसच्या पुढे अगदी इब्राहीमपट्टमपर्यंत खाडी गाळाने भरली आहे. भाट्ये खाडीच्या मुखाजवळील गाळाचा प्रश्न तर गेली दहा-पंधरा वर्ष ऐरणीवर आहे. सातत्याने फक्त आश्वासने लोकप्रतिनिधींकडून मिळत आहेत. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचल्याने त्या खाडीमध्ये ये- जा करण्यासाठी मच्छीमारांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते.
www.konkantoday.com