निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यातील मच्छिमारांनाही मोठा फटका, ५० हून अधिक नौकांचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात ३ तारखेला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील घरांचे व अन्य मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता या वादळाचा मच्छिमारांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक मच्छिमारांनी हंगाम संपल्यामुळे आपल्या बोटी बंदरात जेटीजवळ आणून ठेवलेल्या होत्या. मात्र आलेल्या वादळाने या बोटी एकमेकांवर आदळल्याने त्यात त्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मिरकरवाडा, दापोली, केळशी आदी भागातील मच्छीमार बोटींचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com