
दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत मंदार खैरकडे रत्नागिरीचे नेतृत्व
जागतिक दिव्यांग दिन सप्ताहानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील पेण येथे राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा १२ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रत्नागिरी दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या संघाचे नेतृत्व चिपळूणचा मंदार खैर करणार आहे.
मंदार याने यापूर्वी खेड, पुणे, सांगली, मुंबई, नागपूर, गोंदिया, हरियाणा, बंगलोर, चंदीगड यासारख्या अनेक ठिकाणी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघात मंदार खैर, सुरेश जोशी, ओंकार साळवी, एकनाथ जोशी, ओंकार गुरव, अंकुश पेवेकर, आशिष पवार, अजय घाणेकर, सचिन पवार, आईनकर, दीपक फुटक, रोहित ओंबळकर, ऋषिकेश महाडिक, जावेद शिरळकर, प्रविण साबळे यांच्यासह प्रशिक्षित रोहित तांबे, अक्षय मोरे, व्यवस्थापक प्रशांत सावंत यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com