
सोमवारपासून बेस्टच्या फेर्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू
सोमवारपासून बेस्टच्या फेर्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या बसेसमध्ये ३० प्रवासी बसून, तर केवळ पाच प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. खासगी कार्यालयातील कर्मचार्यांच्या १० टक्के उपस्थितीस परवानगी मिळाल्याने सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी बेस्टचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे यामुळे बेस्ट सेववर प्रचंड ताण येऊन सोशाल डिस्टंन्सिगच्या नियमांचा फज्जा उडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com