रत्नागिरी जिल्ह्यात 12 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत एकूण संख्या 355
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त झालेल्या अहवालांपैकी काल सायंकाळपासून आत्तापर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 19 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यामुळे आतापर्यंत एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 355 झाली आहे.तसेच उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 137 इतकी झाली आहे.सध्या जिल्ह्यात 210 अॅक्टिव रुग्ण आहेत.तर कोरोनामुळे 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांचे विवरण खालील प्रमाणे आहे.संगमेश्वर 9,राजापूर 2,कामथे 1.
www.konkantoday.com