रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४३,आज प्राप्त ९ अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त होणाऱया अहवालांपैकी काल सायांकाळ पासून आज पर्यंत ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ३४३ इतकी झाली आहे.प्राप्त अहवालात दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या २ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे.आतापर्यंत १२५ रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या १९८ इतकी आहे.तसेच उरलेल्या रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
www.konkantoday.com