रिक्षाचालकाला मारहाण करणार्‍या दोन आरोपींना अटक

रत्नागिरी ः रत्नागिरी पावस मार्गावरील भाट्ये पुल येथे अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकाला मारहाण करून रिक्षाची मोडतोड करणार्‍या कैलास भाटकर व अमेश भाटकर यांचेसह तीन जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील दोनजणांना अटक करण्यात आली आहे. यातील फिर्यादी रिक्षाचालक परेश शिवलकर हे आपल्या रिक्षातून भाडे घेवून जात असता भाट्ये पुलावर समोरून येणार्‍या दुचाकी चालक मोबाईलवर बोलत येत असता त्यांच्या रिक्षावर येवून आदळला. त्यातून वादावादी होवून स्कूटर चालकाने गावातील काही लोकांना फोनवरून बोलावले. या लोकांनी रिक्षाचालक शिवलकर याला मारहाण करून रिक्षेचे मोठे नुकसान केले व रिक्षाचालकाला भाट्ये पुलावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उपस्थित असलेल्या लोकांनी हस्तक्षेप केल्याने दुर्घटना टळली.

Related Articles

Back to top button