
दोपोली येथे NDRFचा जवान डोक्यात विजेचा खांब कोसळल्याने जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले गावात NDRF च्या जवानाच्या डोक्यात विजेचा खांब पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.या NDRF च्या जवानाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविले आहे.डोक्यावर खांब पडल्याने गँभीर जखमी झालेले NDRFचे जवान रोमि महाल वय 40 रा ( हिमाचल) सध्या NDRF पुणे येथे कार्यरत आहेत.काल दापोली येथे निसर्ग चक्रीवादळ झाल्यावर प्रचंड नुकसान झाले आहे.आंजली येथे खांब बाजूला करत असताना त्यात ते जखमी झाले होते.
www.konkantoday.com