कुडाळ गवळदेव येथे पुरूषांची आगळी वटपौर्णिमा
सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे गवळदेव भागात गेली ९ वर्षे पुरूष मंडळी आगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करीत आहे. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळणकर व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून गेली ९ वर्षे पुरूष मंडळी ही वटपौर्णिमा साजरी करीत आहेत. वटपौर्णिमा ही महिलावर्ग मोठ्या उत्साहाने साजरी करीत असतात. मात्र पुरूषांची साजरी होणारी वटपौर्णिमा सर्वदृष्टीने वेगळी ठरत आहे. सुवासिनी महिला ज्याप्रमाणे जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून या दिवशी प्रार्थना करीत असतात. तसेच पुरूषांच्या या वटपौर्णिमेत पुरूष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी व तिला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करतात.
www.konkantoday.com