महाविकास आघाडीच्या सरकारच्या चुका दाखवणे हे विरोधी पक्षाचे काम आहे -डॉ. विनय नातू
महाविकास आघाडीच्या सरकारचे वारंवार व दररोज बदलत असणार्या निर्णयामुळे कोकणातील जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यात भारतीय जनता पार्टी प्रमुख विरोधी पक्ष असल्याने महाविकास आघाडीच्या चुका मांडणे व दाखवून देणे हे भारतीय जनता पक्षाचे काम आहे असे प्रतिपादन माजी आमदार व भाजप उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले आहे. प्रविण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. महाविकास आघाडीचे अनेक कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचा प्रवास करतात. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही जिल्हा प्रवास केला. कोण घरात बसलंय? कोण बाहेर फिरतोय? कोण होम कॉरंटाईन आहे याचे जनतेला परिपूर्ण ज्ञान आहे. आजही मुंबई-पुणे येथून कोकणातील भूमिपुत्र गाडीचे भाडे परवडत नसल्याने व पास परवडत नसल्याने आणि शहरातील नोकरी धंदा बंद झाल्याने पायी चालत येत आहेत. आज राजकारण करण्याची वेळ नाही. कोरोनानंतर उदभवणार्या अनेक समस्यांवर एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com