कडवई बाजारपेठेतील पुलाजवळ चिखल दूर करण्यासाठी स्वराज्य संघटना पुढे सरसावली
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारामुळे व लगतच्या जमीन मालक लक्ष देत नसल्याने कडवई बाजारपेठेनजिक कडवई -तुरळ रस्त्यावर पुलावर काल झालेल्या चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर माती व पाणी साचून चिखल निर्माण झाला होता. यामुळे या पुलावरून वाहतूक करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. चिखलामुळे या ठिकाणी दुचाकीवरून पडून किरकोळ अपघातही झाले. यावेळी या भागातील सामाजिक काम करणार्या स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश गुरव यांना ही गोष्ट कळताच त्यांनी आपले सहकारी दिपक गुरव, प्रयाग गुजर, साईराज गुरव, प्रतिक गुरव आदींनी पुढाकार घेवून श्रमदान करून रस्त्यावर आलेला चिखल बाजूला केला. स्वराज्य संघटनेने घेतलेल्या पुढाकारामुळे लोकांमधून कौतूक होत आहे.
www.konkantoday.com