रत्नागिरी जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३४,आणखी १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात मिरज येथून प्राप्त झालेल्या संशयित कोरोना रुग्णांचा अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव आले आहेत.यातील एका रुग्णाचा काल मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३४ इतकी झाली आहे.आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांपैकी गुहागरमध्ये २, कळंबणी येथे ४,कामथे येथे ३,रत्नागिरी येथे १ व व संगमेश्वर येथील ३ रुग्णांचा यात समावेश आहे.त्यामुळे आता अॅक्टिव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९८ ईतकी झाली आहे.आज ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.यानंतर आत्तापर्यंत एकूण कोरोनावर मात करून घरी सोडलेल्यांची संख्या १२५ झाली आहे . आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे संख्या ११ झाली आहे.अजूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असून जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांची संख्या आतापर्यंत १,१४,५३४ इतके झाली आहे.
www.konkantoday.com