
रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका दापोली मंडणगड तालुक्यांना बसला
निसर्ग वादळ आज सकाळी रत्नागिरीच्या किनारपट्टीलगत येऊन पुढे सरकले याच्या वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर होता यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडणे,पत्रे उडून जाणे, रस्ते बंद होणे असे प्रकार घडले आहेत.सर्वाधिक नुकसान दापोली आणि मंडणगड भागात झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा बंद आहे.रस्ता सुरू करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे.आंबा घाटात झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.मंडणगड आणि लगतच्या भागात मोबाईल कनेक्टिविटी पूर्णपणे बंद पडली आहे.
www.konkantoday.com