
अतिक्रमण मोहिमेत भंगार व्यावसायिकांच्या अनधिकृत शेड जैसे थे.
चिपळूण शहरातील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात नगर परिषदेने धडक मोहीम होती घेत ती हटवली. याशिवाय पालिका प्रशासन अतिकमिणावर लक्ष ठेवून आहे, असे असताना मुख्य रस्त्यावरच्या टपर्यासह हातगाड्या हटवल्यानंतर या मोहिमेंतर्गत पालिकेने शिवनदीसह भररस्त्यावर भंगार व्यावसायिकांच्या असलेल्या अनधिकृत बंदिस्त शडवर लक्ष केंद्रीत केले नसल्याचे चित्र आहे. अतिक्रमण मोहीम असताना व्यावसायिकांच्या शेड आजही जैसे थे स्थितीत असून यासंदर्भात नगर परिषदेने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी सामान्य वर्गातून पुढे येत आहे.काही दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत मुख्य रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटवली. यात प्रामुख्याने फळ, भाजी, कपडे विक्री करणार्यांसह टपर्याधारकांचा सर्वाधिक समावेश आहे.
मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणातून मुक्त झाला असून अतिक्रमण विरोधात नगर परिषदेचे पथक गस्त घालत आहे. तसे पाहिल्यास चिपळूण शहरात आलेल्या महापुरानंतर शिवनदीतील गाळ काढला जात असतानाच नदीतच उभारलेल्या भंगार व्यावसायिकांच्या अनधिकृत बंदिस्त शेड प्रश्न प्रामुख्याने पुढे आला होता. यातूनच प्रशासनानेही या शेडसंदर्भात कारवाइंचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेले नाही.www.konkantoday.com