
चिपळुणात हद्दपारीचे उल्लंघन करणार्यावर गुन्हा
. एका वर्षासाठी हद्दपार होण्याचे आदेश असतानाही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर गुरूवारी चिपळूण पोलीस स्थानकातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुएब जमील सय्यद (२६, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद समिधा सुहास पांचाळ यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुएब सय्यद याला चिपळूण उपविभागातून एका वर्षासाठी हद्दपार करण्याबाबत येथील प्रांताधिकार्यांनी आदेश केले होते. तरीही जुएबने चिपळूण उपविभागाच्या हद्दीत येण्याची येथील न्यायालय, जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच प्रांताधिकार्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विनापरवाना हद्दपारी करत आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com




