मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी याबाबत आवाज उठवत या प्रकाराला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे.
सोमैया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील लालबागच्या जीजामाता नगरमध्ये राहणारे ७० वर्षांचे रुग्ण कोरोनासदृश लक्षणं असल्याने १४ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १८ मे रोजी त्यांची अचानक तब्बेत खालावल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १९ मे रोजी सकाळी रुग्णालयातून रुग्ण हरवला असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. रुग्ण वॉर्डमधून हरवल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आलेत्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २१ मे रोजी एक मृतदेह दाखवत तो संबंधित रुग्णाचा असल्याचे सांगितले. पण तो आपल्या रुग्णाचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर १० दिवस झाले तरी आजपर्यंत त्या रुग्णाचा शोध सुरु आहे. पण ते कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही, असे सोमैया यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
www.konkantoday.com