फिनोलेक्स मुकुल माधव फाउंडेशन कडून पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना मदतीचा हात.
सध्या कोरोना निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे गावातील गरीब, विधवा स्त्रिया, अपंग व्यक्ती अशा लोकांवर अडचणीची वेळ आली होती तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या लॉक डाऊनमुळे घरातील अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता. रोजगार निर्मिती बंद होती. अशा परिस्थितीत कंपनीने सामाजिक बांधिलकी दाखवत पंचक्रोशीतील गोळप, कोळंबे, फनसोप, भाट्ये, पावस या ग्रामपंचायतींनी संपर्क साधून येथील निराधार, गरीब, विधवा स्त्रिया, अपंग अशा सुमारे १५०० व्यक्तींना त्वरित जीवनावश्यक किराणा वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्या. जेणेकरून या व्यक्तींवर अडचणींची वेळ येणार नाही . तसेच या ग्रामपंचायतींना गरजेनुसार सनीटायझर व मास्क मोफत देण्यात आली.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पंचक्रोशी ग्रामपंचायतीकडून व सर्व लोकंस्तरावरून फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनचे आभार व्यक्त होत आहेत.