हातखंबा पेट्रोल पंपाजवळ वाहनांच्या अपघातात ५ जण जखमी
रत्नागिरी येथील हातखंबा पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी झालेल्या ट्रक, टेम्पो व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांना जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थांच्या रूग्णवाहिकेने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणला निसर्ग वादळाचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरीसह आजुबाजूच्या परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. या निसरड्या रस्त्यांमुळे हा अपघात झाला. ही वाहने एकमेकांवर आदळल्याचे कळते.झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना आजुबाजूच्या ग्रामस्थांनी बाहेर काढून त्यांची रूग्णवाहिकेतून रवानगी केली. या अपघातात वाहनांचेही नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com