
कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका परिचारिकेने अनावधानाने चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर केले उपचार आमदार नितेश राणे यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला
सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत शहरी भागांपूरता मर्यादित असलेला कोरोना विषाणू आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका परिचारिकेने अनावधानाने चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर उपचार केल्याचे समोर आले आहे. या कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.नितेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा रुग्णालयातील या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. नितेश राणे म्हणाले की, संबंधित परिचारिकेला स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत क्वारेंटाइन करणे आवश्यक होते. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधित नर्सला चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी देऊन तेथील लहान मुलांचे आरोग्य सिव्हील सर्जननी धोक्यात घातले आहे. डॉ. चाकूरकर यांच्या भोंगळ कारभागामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
www.konkantoday.com