बीएएमएस डॉक्‍टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित करावे आ. शेखर निकम यांची राज्य शासनाकडे मागणी

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी गट-अ (बीएएमएस) यांना नियमित करावे, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज राज्यातील कोरोना संकटांमध्ये कोकणातील ग्रामीण भागात काम करणारे बीएएमएस तथा वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्याकडून कोरोना आजारावर उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा स्वखर्चाने दिवस-रात्र दिली जात आहे. प्रत्येक गाव-वाडी-घर येथे जाऊन कोररोनाविषयी लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत. कमी मानधनामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणतीही जोखीम अथवा तत्सम भत्ता नसतानाही अविरत रुग्णसेवा देत आहेत. बीएएमएस तथा वैद्यकीय अधिकारी गट-अ हे दि. १ सप्टेंबर २०१९पासून कार्यरत झाले आहेत. कोरोना रोग नियंत्रण कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमित होणे अत्यंत गरजेचे आहे. शासन निर्णयानुसार एमबीबीएस अर्हताधारक कंत्राटी किंवा नियमित होईपर्यंत बीएएमएसधारक भरण्याची बाब शासनाने केली आहे. त्यामुळे एमबीबीएसधारक पद भरतीनंतर बीएएमएस आर्हताधारक यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येते. ही अट शिथिल करून बीएमएमएस डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून आ. निकम यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button