
लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य शासन आज घोषणा करणार
केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याबाबत राज्य शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आज रविवारी याबाबत घोषणा करण्यात येईल. कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली
कंटेन्मेंट झोन सोडून लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची मुभा केंद्राने राज्यांना दिलेली आहे. तथापि, राज्यातील परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे इच्छुक नसल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे मुख्य मार्गदर्शक असलेले शरद पवार हे लॉकडाऊन शिथिल करून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न व्हावा, या मताचे आहेत.पवार यांनी शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी त्यादृष्टीने चर्चा केली. कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र काही व्यवहार सुरू करण्याचा आग्रह पवार यांनी यावेळी धरला, असे सूत्रांनी सांगितले.
www.konkantoday.com