
जिल्ह्यात यावर्षी फुटणार २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या
रत्नागिरी: दहीहंडीचा सण काही दिवसांवर आला असून तो उत्साहात साजरा करण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. सर्वाधिक हंड्या जयगड, दापोली, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.
रत्नागिरी शहर सार्वजनिक ६ खासगी ७०; रत्नागिरी ग्रामीण सार्वजनिक ५५ खासगी ६६; जयगड सार्वजनिक १५ खासगी १३२; राजापूर सार्वजनिक ३५ खासगी ५०; नाटे सार्वजनिक १, खासगी ९६: लांजा सार्वजनिक २७ तर खासगी ५५, देवरूख सार्वजनिक ८ तर खासगी ३०, संगमेश्वर सार्वजनिक ७ खासगी १००, सावर्डे सार्वजनिक ४, खासगी १५०; चिपळूण सार्वजनिक १३, खासगी ३००; अलोरे सार्वजनिक ५ खासगी ३०, गुहागर सार्वजनिक ६, खासगी १००, खेड सार्वजनिक १४ खासगी ३००, दापोली सार्वजनिक २७ खासगी ३००, मंडणगड सार्वजनिक ४ खासगी १८३, बाणकोट सार्वजनिक ११ खासगी २००, पूर्णगड सार्वजनिक १० खासगी २०, दाभोळ सार्वजनिक ३ खासगी १५७ दहीहंडी उत्सव साजरे केले जाणार आहे.
दोन दिवसांवर आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथके सज्ज झाली असून काही पथकांमार्फत सराव सुरू आहे. सध्या दहीहंड्यांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या किमतीतही स्पर्धा असल्याने सध्या दहीहंडीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.