
आता तो साडेचार फुटाचा मंत्री सांगत आहे की जात विचारून दुकानातून सामान घ्या-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
देशात आणि राज्यात जातीयतेचे विष पेरलं जात आहे. बीड मध्ये दोन जाती एकमेकाच्या पुढे आणल्या जात आहेत. अशातच आता तो साडेचार फुटाचा मंत्री सांगत आहे की जात विचारून दुकानातून समान घ्या.असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे. दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याची चिंता भाजपला पडली आहे. किंबहुना दोन भाऊ एकत्र येत असताना सर्वधर्म समभाव घेऊन सोबत यावं. तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन दोन्ही ठाकरेंनी सोबत यावं. असं झाल्यास आम्ही तुमचा सत्कार करू, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.