रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा दोनशे पन्नास चा टप्पा पार,अजुन 22 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात आता आणखी 22 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 256 झाली आहे.सायंकाळपर्यंत मिरज येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचे विवरण खालीलप्रमाणे संगमेश्वर 9 अहवाल 6 पॉझिटिव्ह, 1 निगेटिव्ह, 2 निष्कर्ष नाही.रत्नागिरी 9 अहवाल 8 पॉझिटिव्ह, 1 निगेटिव्ह.कामथे 10 अहवाल 8 पॉझिटिव्ह, 1 निगेटिव्ह यानंतर आता जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 256 झाली आहे.तर 93 लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.यातील  227 रुग्ण सकाळपर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.
(सध्या येणारे अहवाल हे होम क्वारंटाईन झालेल्या रुग्णापैकी आहेत. त्यामुळे त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत काही कालावधी लागतो. त्यामुळे येणारे आकडे यांनतर वेगवेगळे असू शकतात.) आतापर्यंत जिल्ह्यात 1,00,795 चाकरमानी कोकणात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button