
डोंगराला भेगा पडल्याने तळेकांटे ग्रा.पं. क्षेत्रातील २२ घरांना धोका
डोंगराला भेगा पडून भूस्खलनाचे प्रमाण हळूहळू वाढू लागल्याने तळेकांटे मांजरेकरवाडी, कळंबटेवाडीतील २२ घरांना धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासंदर्भात शासकीय यंत्रणेने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी तळेकांटे ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. भूस्खलनाचे प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डोंगरावरील मांजरेकरवाडीतील १४, डोंगराच्या खाली असलेल्या कळंबटेवाडीतील ८ घरांना धोका निर्माण झाला आहे. दोन्ही वाड्यांमधील एकण ३१ कुटुंबातील ५५ नागरिकांना गावठाणवाडी समाजमंदिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याचा तपशील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, देवरूख तहसिलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांच्याकडे पाठविलाआहे .www.konkantoday.com