अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय नकाे -ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरु आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला
www.konkantoday.com